Over 10 years we help companies reach their financial and branding goals. Maxbizz is a values-driven consulting agency dedicated.

Gallery

Contact

+1-800-456-478-23

411 University St, Seattle

maxbizz@mail.com

पुणे पत्रकार सहकारी गृहरचना संस्था (मर्यादित)

समाजातील पत्रकार हा घटक 1960 – 70 च्या दशकापर्यंत आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत होता. मात्र त्यांना समाजात प्रतिष्ठा होती. कितीतरी वर्तमानपत्रे, मासिके, इतर नियतकालिके अगदी सुरुवातीच्या काळापासून पुण्यात प्रकाशित होत होती. निर्भीड पत्रकारिता करणारे अनेक जाणकार पत्रकार तिथे कार्यरत होते.

या पत्रकारांना एकत्र आणावे, त्यांच्यासाठी त्यांच्या हक्काचे संकुल उभारावे, या उद्देशाने 23 ऑक्टोबर 1966 रोजी नियोजित पत्रकार सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना झाली.
ज्यांचा खूप सन्मानाने उल्लेख करावा, असे संस्थेचे पहिले प्रवर्तक (प्रमोटर्स) सर्वश्री मधुकर द. जोशी, शं. ह. देशपांडे, के. का. भानू, वि. चिं. इनामदार, मो. प्र. फडके, द. ना. देशपांडे, सुधाकर अनवलीकर, यदुनाथ थत्ते, प्रसन्नकुमार अभ्यंकर, एकनाथ बागूल, सुधाकर वेलणकर आणि म. श्री. पगार या सर्वांची ही संस्था सदैव ऋणी राहील.

या सर्वांच्या प्रयत्नांनी 1 जानेवारी 1971 रोजी संस्थेची नोंदणी करण्यात आली. दिनांक 30.3.1973 रोजी शासनाने संस्थेस तीन एकर एक गुंठा जागा, काही अटींसह मंजूर केली आणि दिनांक 3.4.1973 रोजी ताबा पावती करून जागा संस्थेच्या ताब्यात देण्यात आली.

संस्थेचा पायाभरणी समारंभ 10 एप्रिल 1978 रोजी झाला. तसेच 15 ऑगस्ट 1979 रोजी संस्थेच्या 102 सभासदांना, त्यांच्या निवडीप्रमाणे सदनिका व डुप्लेक्स ताब्यात देण्यास सुरुवात झाली.

वर उल्लेख केलेले संस्थेचे प्रवर्तक; तसेच वास्तुविशारद (आर्किटेक्ट) श्री. विकास जावडेकर, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर श्री. दिलीप मेहेंदळे, आर. सी. सी. कन्सल्टंट श्री. वाय. एस. साने, बांधकाम सल्लागार श्री. अतुर संगतानी यांचाही मोलाचा वाटा आहे. या सगळ्यांच्या प्रतीही संस्था कृतज्ञ आहे.

संस्थेतील इमारती आता चाळीसहूनही अधिक वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे देखभालीचा वाढीव खर्च, जुन्या पाईप लाइन्स, ड्रेनेज लाइन्स, कव्हर्ड पार्किंगचा अभाव, लिफ्टची सोय नसणे आणि आधुनिक राहणीमानाप्रमाणे इतर सुविधाही असाव्यात, या विचारांमुळे पुणे पत्रकार सहकारी गृहरचना संस्थेचे ‘पुनर्निर्माण’ करून येथील सर्व सभासदांसाठी, आजच्या जीवनमानाला साजेशी, सर्व आधुनिक सुखसुविधांनीयुक्त एक छानशी नवीन गृहरचना असावी, असा विचार संस्थेच्या बहुसंख्य सभासदांच्या मनात आला आणि संस्थेच्या पुनर्निर्माण प्रकल्पाला चालना मिळाली.

संस्थेच्या पुनर्निर्माणाचा पहिला प्रयत्न जवळपास 10 वर्षांपूर्वी करण्यात आला. पण आवश्यक बहुमताअभावी ती योजना होऊ शकली नाही. संस्थेच्या पुनर्निर्माणाची योजना 2021 मध्ये परत घेण्यात आली. यावेळेस मात्र बांधकामविषयक नवीन सहकारी कायदे, नियम व उपविधीतील तरतुदींचे पूर्णपणे पालन करत संस्थेच्या बहुतांश सभासदांनी पुनर्निर्माण योजनेला मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने एक एक पायरी चढत या योजनेला आता गती आली आहे.

या प्रक्रियेत सर्व सभासदांना विश्वासात घेणे, प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता असणे, पंचसमिती, संस्थेचे सल्लागार आणि सभासद यांच्या कामात सुसूत्रता असावी याकरिता संस्थेची एक विशेष वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ज्यावरून संस्थेच्या पुनर्निर्माणासंबंधी सगळी माहिती प्रत्येक सभासदाला नेहमी उपलब्ध असेल.

याकरिता संस्थेतील प्रत्येक सभासदाला एक लॉग इन पासवर्ड देण्यात येईल. ज्याचा उपयोग करून सभासद सगळी माहिती त्यांच्या डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा मोबाइलवर घेऊ शकतात. मात्र या माहितीचा उपयोग केवळ सभासदांनाच करता येईल. पुनर्निर्माणासंबंधी काही प्रश्न असल्यास सभासदांना या वेबसाइटवरून पंचसमितीला विचारता येतील.

आपले सर्व सभासद या वेबसाइटचा उपयोग करतील आणि संस्थेची पुनर्निर्माण योजना पूर्णत्वास नेतील, असा पंचसमितीला विश्वास आहे.

पंचसमिती सदस्य - 2021-2026

श्री. विजय सावंत
अध्यक्ष
श्री. विनायक पटवर्धन
सचिव
श्रीमती अरुंधती भिडे
खजिनदार
श्री. प्रदीप नेवाळकर
सदस्य
श्री. सुवर्णकांत ठाकोर
सदस्य
श्री. विजय लेले
सदस्य
श्री. अनंत शालिग्राम
सदस्य
श्री. राजाराम जोशी
सदस्य
श्री. अनंत बेदरकर
सदस्य
श्रीमती ऋता बावडेकर
सदस्य

पुनर्निर्माण योजना सल्लागार -
M/s Aniruddha Vaidya & Associates, Pune.

Shri. Harshal Kavdikar
Advocate Nitin Sardesai
Advocate Smt. Kiran Kabra

सभासद यादी 31 मार्च 2022 अखेर